अवैध दारु वाहतूक प्रकरणी दोघे ताब्यात
राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
कराड व परिसरात शहर पोलिसांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैध दारु वाहतूक व विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाच्या पथकाने कारवाई मोहीम सुरू केली. त्यानुसार शुक्रवार दि. 31 रोजी सकाळी उत्पादन शुल्कच्या पथकाने मलकापूर व चचेगाव येथे कारवाई करत दारुच्या बाटल्यांसह सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कराड : कराड व परिसरात शहर पोलिसांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैध दारु वाहतूक व विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाच्या पथकाने कारवाई मोहीम सुरू केली. त्यानुसार शुक्रवार दि. 31 रोजी सकाळी उत्पादन शुल्कच्या पथकाने मलकापूर व चचेगाव येथे कारवाई करत दारुच्या बाटल्यांसह सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दीपक बबलू कांबळे रा. साकुर्डी, ता. कराड व मुस्तफा मोहिद्दीन मणियार रा. लक्ष्मीनगर, मलकापूर अशी ताब्यात घेतलेल्या संशयीतांची नावे आहेत.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क तथा दारुबंदी विभागाकडून मिळालेली माहिती अशी, कराड व परिसरात शहर पोलिसांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागाच्या अधिक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार उत्पादन शुल्क तथा दारुबंदी कार्यालयाच्या येथील पथकाने अवैध दारु वाहतूक रोखण्यासाठी शुक्रवार दि. 31 रोजी सकाळी गस्त सुरु केली होती.
यादरम्यान, उत्पादन शुल्कच्या पथकाने मलकापुर व चचेगाव या दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. त्यामध्ये देशी मद्याच्या एकूण २४० बाटल्या, तसेच प्रत्येकी अर्धा लिटरच्या बिअरच्या १४४ बाटल्या व दोन चारचाकी वाहने, अशी मिळून १ लाख ९५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई निरीक्षक एस. एस. साळवे, सहाय्यक निरिक्षक एस. बी. जंगम, एन. के. जाधव, जवान व्ही. व्ही. बनसोडे, बी. एस. माळी, एस. बी. जाधव यांच्या पथकाने केली. निरिक्षक एस. एस. साळवे अधिक तपास करत आहेत.