maharashtra

सात लाखांच्या मोटर चोरी गुन्ह्याची उकल

सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

शिरवळ येथून चोरीस गेलेल्या सात लाखांच्या कार चोरी गुन्ह्याची उकल करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

सातारा : शिरवळ येथून चोरीस गेलेल्या सात लाखांच्या कार चोरी गुन्ह्याची उकल करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
सुशांत बाळासो रासकर  वय 23  रा.  नागेश्वरनगर  जिंती नाका फलटण तालुका - फलटण जिल्हा - सातारा असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 ऑक्टोबर रोजी शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील सैफी स्क्रॅप नावाच्या दुकानासमोर लावलेली लाल रंगाची स्विफ्ट कार क्र. एमएच 11 डीएच 6242 अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दि. 3 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की एक इसम चोरीस गेलेली स्विफ्ट कार वर्ये, ता. जि. सातारा येथील विठ्ठल मंगलम कार्यालय येथे विक्री करण्यासाठी घेऊन येणार आहे. त्यानुसार देवकर यांनी सपोनि रवींद्र भोरे व त्यांच्या पथकास संबंधित  ठिकाणी जाऊन नमूद इसमास पकडून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे भोरे यांनी विठ्ठल मंगलम कार्यालय वर्ये या ठिकाणी जाऊन सापळा लावून कौशल्याने माहिती मिळालेल्या इसमास चोरीस गेलेल्या कारसह पकडून त्याच्याकडे ताब्यातून चोरीस गेलेली 7 लाखांची स्विफ्ट कार हस्तगत केली आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस अंमलदार आतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रवीण फडतरे, सनी आवटे, अमित माने, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्निल कुंभार, ओमकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, अरुण पाटील, विशाल पवार, प्रवीण पवार, रोहित निकम, सचिन ससाने, पृथ्वीराज जाधव, मयूर देशमुख, संकेत निकम, शिवाजी गुरव, सायबर विभागाचे अमित झेंडे, अजय जाधव यांनी सहभाग घेतला.