Devendra Fadnavis : ओबीसींसाठी वेगळी आवास योजना सुरु होणार असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. Devendra Fadnavis : ओबीसींसाठी वेगळी आवास योजना सुरु होणार असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
राज्य शासनामार्फत विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी घरकुल योजना (Gharkul Schmes) राबवण्यात येतात. ज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, राज्यासह देशभरात सर्वपरिचित असलेली पंतप्रधान मोदी घरकुल योजना (PMYJA), अशा विविध योजना विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी शासनामार्फत राबवण्यात येतात. त्याचबरोबर राज्यातील ओबीसींसाठी वेगळी आवास योजना सुरु होणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज अहमदनगर, शिर्डी (Shirdi) दौऱ्यावर आहेत. आज सकाळी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. तसेच अहमदनगर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे तब्बल वर्षभरानंतर नगरला आल्याचे सांगण्यात येत आहे. आज त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीतील मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.
दरम्यान यावेळी फडणवीस म्हणाले की, अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) झालेल्या नुकसानीचे सर्वच शेतकऱ्यांना अनुदान मिळेल. त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेला गती देण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी 'गाळमुक्त धरण, गाळमुक्त तलाव' योजनेला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेत नगर जिल्ह्याचे उत्तम काम असल्याचे सांगत आगामी काळात ओबीसीसाठी वेगळी आवास योजना सुरु होणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री सौर्यपंप योजनेचे सुरुवात राळेगणसिद्धीतून केली होती, आता हीच योजना राज्यभर नेणार आहोत. सौर पंप योजनेच्या 800 फीडरसाठी जागा शोधण्याचे काम सध्या सुरु आहे. शेतकऱ्यांसाठी 291 कोटी अनुदान मंजूर असून त्यातील 161 कोटी अनुदानाचे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केल्याचे फडणवीस म्हणाले.
दोघांमध्ये समन्वय व्हावा म्हणूनच....
तसेच फडणवीस पुढे म्हणाले की, खा. गजानन किर्तीकर यांनी असे वक्तव्य केलेलं नाही. या कपोलकल्पित गोष्टी आहेत. तर दुसरीकडे भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर ते म्हणाले की, आमदार राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे यांच्यात वाद नाही, त्यांच्यात समन्वय आहे. त्याचबरोबर दोघांमध्ये समन्वय व्हावा म्हणूनच मी त्यांच्यामध्ये बसलो, असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस नगर जिल्ह्याचे प्रभारी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. महत्वाचे म्हणजे नगर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर फडणवीस थेट वर्षभराने नगरमध्ये आले असून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी शिर्डी येथे होणार आहे. या कार्यक्रमास फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्या आधी सकाळी नगर शहरांमध्ये त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत.