रिपाईचे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन
इंद्र मेगवाल मृत्यू प्रकरणाचा साताऱ्यात निषेध
राजस्थान जालोर जिल्ह्यातील इंद्र मेघवाल यामुळे इतर समाजाच्या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांच्या ग्लास मधून पाणी पिल्याने त्याला मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या अमानुष घटनेचा साताऱ्यात रिपाई जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध करण्यात आला.
सातारा : राजस्थान जालोर जिल्ह्यातील इंद्र मेघवाल यामुळे इतर समाजाच्या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांच्या ग्लास मधून पाणी पिल्याने त्याला मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या अमानुष घटनेचा साताऱ्यात रिपाई जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी जातीव्यवस्थेची चौकट मोडणारी प्रतिकात्मक आकृती काठीने मडके फोडून करण्यात आली या आंदोलनामध्ये रिपाई संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. जालना जिल्ह्यातील इंद्रराज यांनी इतर समाजाच्या विद्यार्थ्यांनी तहान लागली म्हणून मुख्याध्यापकांच्या ग्लासमधून पाणी पिले. त्या मुख्याध्यापकांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभर उमटले आहेत साताऱ्यात रिपाई संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. 'इंद्रराज हमे माफ करो, ये आजादी छोटी है' अशा निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. जातीव्यवस्थेची उतरंड नष्ट करण्यासाठी काठीने मटके फोडण्याची प्रतिकात्मक कृती करण्यात आली. दादासाहेब ओव्हाळ यांनी यासारख्या अमानवीय घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. यापुढे अशा घटनांच्या विरोधात रिपाई संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.