maharashtra

अवैध वाळू उपशावर सातारा शहर पोलिसांची धाड

तब्बल 41 लाख 20 हजार रुपयांचे साहित्य जप्त; दोघांवर गुन्हा

Satara city police raid on illegal sand dunes
सोनगाव संमत निंब ता.सातारा येथे सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 41 लाख 20 हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

सातारा : सोनगाव संमत निंब ता.सातारा येथे सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 41 लाख 20 हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
अनिकेत दिलीप डांगे (वय 21, रा. क्षेत्रमाहुली ता.सातारा) व जनार्दन जयवंत देसाई (रा.कार्वे ता.कराड) या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून यातील अनिकेत डांगे याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सुरु असताना जयवंत देसाई हा मालक असल्याची कबुली संशयित अनिकेत डांगे याने पोलिसांना दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर पोलिस ठाण्यााचे सपोनि चेतन मछले यांना सोनगाव सं.निंब येथील कृष्णा नदीपात्रात वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करुन दि. 24 रोजी छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता वाळूचे उत्खनन सुरु असल्याचे निदर्शनास आले. यावेळी अनिकेत डांगे याला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याकडे अधिक चौकशी केली. पोलिसांनी घटनास्थळी असलेला जेसीबी पोकलॅन्ड, दोन चाकी ट्रॅक्टरची हायड्रोलिक ट्रॉली, दुचाकी, वाळूचे ढीग असा मुद्देमाल होता. पोलिसांनी तो सर्व जप्त केला. पोलिसांनी संशयित दोघांविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यातील डांगे याला अटक केली आहे.