maharashtra

सातारा जिल्हा रुग्णालयात डीईआयसी मध्ये बालकांसाठी अस्थिरोग विशेषतज्ञ डॉक्टरांचे शिबिर संपन्न


येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात डी ईआय सी विभाग नंबर ३० येथे शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांसाठी अस्थिरोग विशेषतज्ञ डॉ. अवि शहा व एस आर सी सी हॉस्पिटल टीम मुंबई आणि आरबी एस के डी ई आय सी सातारा यांचे मार्फत विशेषतज्ञ डॉक्टरांचे शिबिर संपन्न झाले .

सातारा : येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात डी ईआय सी विभाग नंबर ३० येथे शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांसाठी अस्थिरोग विशेषतज्ञ डॉ. अवि शहा व एस आर सी सी हॉस्पिटल टीम मुंबई आणि आरबी एस के डी ई आय सी सातारा यांचे मार्फत विशेषतज्ञ डॉक्टरांचे शिबिर संपन्न झाले .

या शिबिरात दीप्ती रसाळ भौतिकोपचार तज्ञ हेमा घाडगे यांनी समुपदेशन केले तर स्टाफ नर्स तृप्ती सोनटक्के यांनी शिबिरात दरम्यान विविध गोष्टींची मांडणी व रजिस्ट्रेशनचे काम पाहिले. सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातून एकूण 90 बालकांची तपासणी या शिबिरा दरम्यान करण्यात आली .तपासणीनंतर अंदाजे 35 बालकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले शिबिरामध्ये 27 बालकांना भौतिक उपचार, दहा बालकांना शूज, दहा बालकांना मेंदू रोग तज्ञाचे उपचार याप्रमाणे सल्ला देण्यात आला सदर शस्त्रक्रिये करिता पात्र असणाऱ्या बालकांना एसआरसीसीमार्फत मोफत शस्त्रक्रिया करण्याकरिता आरबीएस के डी पी एस व डी ई आय सी मॅनेजर यांनी नियोजन केले, तर इतर बालकांना विभागांमध्ये फेर तपासणी करिता बोलावून थेरपी देण्यात येणार आहे .सदर शिबिरा करता माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .सुभाष चव्हाण अतिरिक्त जिल्हा असल्य चिकित्सक डॉ .सुभाष कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी आर बी एस के डी ई आय सी सातारा टीम उपस्थित होती डीईआईसी व्यवस्थापक आहार तज्ञ आर्या पेंढारकर यांनी उपस्थित डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले तसेच बालकांना आणि पालकांना फेर तपासणी बाबत सूचना देऊन हे शिबिर संपन्न झाले.