पार्किंगच्या जागा दोन दिवसांत नागरिकांच्या उपयोगाकरीता उपलब्ध करुन द्या
खा. उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिल्या कानपिचक्या
पुर्वीच्या प्रस्तावातील प्रत्यक्षात उपयोगात येणाऱ्या पार्किंगच्या जागा दोन दिवसांत नागरीकांच्या उपयोगाकरीता उपलब्ध करुन द्या, आम्हाला यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे सांगायला लावू नका, अश्या खरपुस शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला कानपिचक्या दिल्या.
सातारा : सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने विस्तार झाला आहे. सातारा शहरात येणाऱ्या वाहनांसाठी पुरेसे पार्किंग असेल तर एकंदरीत व्यापार - उदिमामध्ये वाढ होण्याबरोबरच सातारा शहराच्या सुविधेत आणि सौदर्यात भर पडणार आहे. सातारा जिल्हा बिल्डर्स असोसिएशन आणि सातारा जिल्हा आर्किटेक्ट असोसिएशन यांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी आणि नगरपरिषदेचे शहरविकास विभाग यांच्या संयुक्त समितीच्या माध्यमातुन शहरातील आरक्षित जागा विकसित करण्याबाबत नवीन प्रस्ताव द्या, पुर्वीच्या प्रस्तावातील प्रत्यक्षात उपयोगात येणाऱ्या पार्किंगच्या जागा दोन दिवसांत नागरीकांच्या उपयोगाकरीता उपलब्ध करुन द्या, आम्हाला यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे सांगायला लावू नका, अश्या खरपुस शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला कानपिचक्या दिल्या.
सातारा शहरातील आरक्षित पार्किंग जागांचा आढावा आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारच्या शासकिय विश्रामगृहावर घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अॅड.डि.जी. बनकर, बिल्डर्स असोसिएशनचे सागर साळुंखे, माजिद कच्छी, आर्किटेक्ट असोसिएशनचे अनिरुध्द दोशी, सुधीर शिंदे, मयुर गांधी, नगररचनाकार अनील पाटील, नगररचना सहा. आशिष मोगरकर, सतीश साखरे, प्रकाश राजेशिर्के प्रमुख उपस्थित होते.
मागील आढावा बैठकीत प्रशासनाने तहसिल कार्यालयाच्या पिछाडीस असलेल्या ०२ गुंठे जागेत, तेली खड्डा येथील ०२ गुंठे जागेत, मार्केट कमिटी एन. आर. शेठ दुकानाचे समोरील ३.५ गुंठे, रेव्हरंड टिळक मेमो. चर्चच्या ९ गुंठे, राजवाडा डि.सी.सी. बॅन्क जवळील जागेमधील आरक्षित पार्किंगच्या प्रस्तावांचे काय झाले अशी विचारणा केली. कोरोनामुळे दिड-दोन वर्षे विस्कळीतपणा आला असेल परंतु पार्किंगची सुविधा नागरीकांना दिली गेली पाहीजे. यामध्ये आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही अशी ताकिद दिली. येत्या दोन दिवसांत वरील ठिकाणी पार्किंगचा वापर नागरिकांकडून होत असल्याचे आम्हाला दिसले पाहीजे असे सांगुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगीतले की, हृदबाढ झाल्याने नवीन भागाचा डि.पी. तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये याविषयांतील तज्ञांची मदत घेतली पाहीजे. त्यासाठी सेवाभावी वृत्तीने नगरपरिषदेस सेवा देवू शकणारे बिल्डर असोसिएशन आणि आर्किटेक्ट असोसिएशन या संघटनांच्या प्रत्येकी दोन तज्ञ सदस्यांना घेवून प्रशासनाने त्यांच्या बरोबर संयुक्त बैठका घेवून नवीन डेव्हलपमेंट प्लॅन तयार करावा जेणेकरुन प्रशासनावर ताण न येता, सातारच्या भविष्यातील सुविधांबाबत सुयान्य नियोजन करता येईल असे देखिल यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगीतले.
दोन्ही असोसिएशनच्या उपस्थित सदस्यांनी वेळ देणारे सदस्य आपली सेवा, नगरपरिषद ही मातृसंस्था असल्याने, सेवामा वृत्तीने नगरपरिषदेला उपलब्ध करुन देतील असा विश्वास दिला. बैठकीच्या सुरुवातीस अँड.डि.जी. बनकर यांनी प्रस्ताविक केले. यावेळी काका धुमाळ, संजय पाटील, संग्राम बर्गे, अॅड विनित पाटील, गणेश चव्हाण, आदी उपस्थित होते.