maharashtra

मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा


कळकाने मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : कळकाने मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक पाच डिसेंबर रोजी आठ वाजण्याच्या सुमारास योगेश रामचंद्र जाधव वय 40 राहणार गोवे, ता. सातारा यांना तेथीलच नावेद शौकत मोमीन याने आमच्या दुकानापुढून जायचे नाही, असे म्हणून कळकाने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार बागवान करीत आहेत.