कोणी पक्ष फोडायचं काम करत असेल तर त्यांनी ते करावं : शरद पवार
साहस वार्ता
अमरावती (वृत्तसंस्था): कोणी जर पक्ष फोडण्याचं काम करत असेल तर त्यांनी ते करावं, आम्ही आमची भूमिका घेऊ असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार याच्या राजकीय भूमिकेविषयी चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्याला महत्त्व आहे. अदानी प्रकरणात जर विरोधी पक्ष जेपीसी स्थापन करण्याची भूमिका घेत असतील तर मी त्याला विरोध करणार नाही, त्यांच्या सोबत असेन असंही शरद पवार म्हणाले.
वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कर्नाटक निवडणुकीबाबत आमची चर्चा झाली आहे. कर्नाटकात ते काही जागा लढवत आहेत, राष्ट्रवादीही काही जागा लढवत आहेत. आमची यादी त्यांना दिली आहे, ते
यादी देतील त्यावेळी सविस्तर चर्चा करता येईल.