maharashtra

सोनगावच्या सुवर्ण पतसंस्थेत भ्रष्टाचार; १६ जणांविरुध्द गुन्हा


सोनगाव तर्फ सातारा येथील सुवर्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत चेअरमनसह एकूण 16 जणांनी 67 लाख 51 हजार 910 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सोनगाव तर्फ सातारा येथील सुवर्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत चेअरमनसह एकूण 16 जणांनी 67 लाख 51 हजार 910 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महिपती एकनाथ नावडकर, शरद नारायण रोकडे, अंकुश संपतराव जाधव, हिम्मत महादेव जाधव, शंकर तुकाराम जाधव, केशव रघुनाथ नावडकर, सतिश शंकर नावडकर, अनिल महादेव जाधव, अनिल दयानंद कांबळे, रघुनाथ पांडूरंग जाधव, बाबूराव जयसिंग नावडकर, गुलाब विठोबा जाधव, अशोक वामन नावडकर यांच्यासह महिलांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. याप्रकरणी शैलेश जनार्दन जाधव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ते लेखापरीक्षक आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 2020 ते 2022 या कालावधीत घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संशयितांनी आपआपसात संगनमत करुन लेखापरीक्षण फी, सेव्हिंग खात्यांमध्ये पोकळ जमाखर्च करणे, ठेवतारण कर्ज व व्याज प्रत्यक्षात रोखीने जमा झाल्याचे दाखवून आणि ठेवी व त्यावरील व्याज रोखीने अदा केल्याचे दाखवून अपहार केला आहे. तसेच ठेवीदार यांना ठेवीची मुदत पूर्ण होवूनही रकमा दिल्या नाहीत. यावरुन संशयितांवर अपहार, फसवणूकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.