चोरीस गेलेल्या दुचाकीचा छडा लावण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
सातारा : चोरीस गेलेल्या दुचाकीचा छडा लावण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
सातारा शहरातील विसावा नाका येथून एक महिन्यापूर्वी चोरी केलेल्या दुचाकीचा छडा लावण्यात शहर पोलिसांना यश आहे. चोरी प्रकरणी मनोहर उर्फ सोन्या विठ्ठल भोसले (वय २८, रा. कारंडवाडी ता.सातारा) याला अटक करण्यात आली आहे. शहर पोलिस गस्त घालत असताना त्यांना विना क्रमांकाची दुचाकी दिसली. दुचाकी चालकाला थांबवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली. फौजदार सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सुजीत भोसले, निलेश जाधव, पंकज मोहिते, संतोष कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.