जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तेजस संतोष शिवपालक वय २२, रा. पाण्याच्या टाकीजवळ, लक्ष्मी टेकडी जवळ, सदरबझार, सातारा केला जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बंन्सल यांनी दि २४ डिसेंबर २०२१ रोजी सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार केलेले असतानाही तो लक्ष्मी टेकडी जवळ, सदरबझार, सातारा येथे आढळून आल्याची तक्रार पोलीस नाईक विक्रम रामदास माने यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. तेजस शिवपालक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.