अवैध दारू विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : अवैध दारू विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 19 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विजय प्रकाश देशमुख रा. सातारा हा भिमाबाई आंबेडकर नगर सातारा कॅनॉल जवळ पत्र्याच्या शेडच्या आडोशाला अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून १०५० रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.