पुसेगाव पोलीस स्टेशनच्या चोवीस तास काम करणार्या करोना योद्धा पोलीस कर्मचारी यांना ग्रामपरिवर्तन संस्था कटगुणच्या वतीने मास्क,सुरक्षा किटचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राजेघाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.
निढळ ः पुसेगाव पोलीस स्टेशनच्या चोवीस तास काम करणार्या करोना योद्धा पोलीस कर्मचारी यांना ग्रामपरिवर्तन संस्था कटगुणच्या वतीने मास्क,सुरक्षा किटचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राजेघाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.
करोना महामारी मध्ये स्वतःचे जीव धोक्यात घालून करोना सेंटर, व परिसरात अहोरात्र सेवा देणार्या साठ पेक्षा अधिक महिला, पुरुष पोलीस, होमगार्ड यांना सन्मान करणेसाठी म. फुले कुलभूमी कटगूण येथील ग्राम परिवर्तन संस्थेच्या वतीने मास्क - एन - 95, सॅनीटायझर, हैपो, कॅन, जंतू नाशक बॉक्स, कोरोना भिंती पत्रक माहिती पत्रके, सुरक्षित गाव पुस्तके, इ, सेवा देण्यात आली.
याप्रसंगी ग्राम परिवर्तन संस्थेचे प्रताप गोरे, प्रकाश राजेघाटगे यांनी विशेष सहकार्य केलें.
सन्मान प्रसंगी देशमुख सिटीचे राजेश देशमुख, किरण सोळंखी यांनीही यावेळी हैपो व सॅनी टायझर देऊन सन्मान केला. यावेळी पुसेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, विजय खाडे (पोलीस दफ्तरी सेवा) चंद्रहार खाडे, सचिन माने, आनंदा गंबरे, महिला पोलीस पुष्पा पाटील, पूनम जगदाळे, अमृता चव्हाण, इतर पोलीस कर्मचारी, होमगार्ड, विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे उपस्थित होते. सपोनि संजय बोंबले यांनी आभार मानून ग्राम परिवर्तन संस्थेच्या कार्यास शुभेच्छा देऊन प्रेरणादायी केले.