विलासपूर, गोडोली येथील दारू अड्ड्यावर छापा मारून सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : विलासपूर, गोडोली येथील दारू अड्ड्यावर छापा मारून सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विलासपूर, गोडोली येथे तेथीलच ओमकार सुनील साळवे वय 25 हा सौभाग्य मंगल कार्यालयाच्या भिंतीच्या आडोशाला अवैध दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 1440 रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.