मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 ऑगस्ट रोजी दहा वाजण्याच्या सुमारास अमोल सुरेश खंडजोडे वय 32, राहणार बुधवार पेठ, सातारा यांनी मोहसिन अमीन पालकर वय 35, सध्या राहणार बुधवार पेठ, सातारा यांना माझ्या पत्नीला पाहून भुवया का उडवतोस, असे विचारल्यावर पालकर यांनी खंडजोडे यांना हाताने व दगडाने मारहाण केली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव करीत आहेत.