maharashtra

सातारा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी संदीप चव्हाण


Sandeep Chavan as the President of Satara Taluka Congress
सातारा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी वेळे कामथी , ता.सातारा येथील संदीप प्रल्हादराव चव्हाण यांची नियुक्ती केल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. जाधव यांनी म्हटले आहे, संदीप चव्हाण हे नव्या पिढीचे आश्वासक प्रतिनिधी आहेत.

सातारा : सातारा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी वेळे कामथी , ता.सातारा येथील संदीप प्रल्हादराव चव्हाण यांची नियुक्ती केल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. जाधव यांनी म्हटले आहे, संदीप चव्हाण हे नव्या पिढीचे आश्वासक प्रतिनिधी आहेत. त्यांचे वडील प्रल्हादभाऊ चव्हाण यांचे जिल्ह्यातील काँग्रेसच्या वाटचालीत मोठे योगदान राहिले आहे. यशवंतराव चव्हाण, किसन वीर, प्रतापराव भोसले, विलासराव पाटील- उंडाळकर, लक्ष्मणराव पाटील यांच्या बरोबरच जुन्या कराड लोकसभा मतदार संघामुळे आनंदराव चव्हाण, प्रेमलाकाकी चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांशी आणि काँग्रेस विचारधारेशी चव्हाण परिवाराचे आगळे ऋणानुबंध राहिले आहेत. तालुका काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा संदीप यांच्याकडे देण्यात म्हणूनच मोठे औचित्य आहे. संदीप हे बांधकाम व्यवसायिक असून वडील प्रल्हादभाऊंच्या सामाजिक-राजकीय कार्याचा वारसा ते पुढे चालवू पहात आहेत. सातारा तालुक्याला विचारशील काँग्रेस कार्यकर्त्यांची एक दैदीप्यमान परंपरा आहे. त्या परंपरेला ते यशस्वीपणे पुढे घेऊन जातील, असा विश्वास या पत्रकात व्यक्त करण्यात आला आहे.
सातारा तालुका काँग्रेसचे दीर्घकाळ अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या नंदाभाऊ जाधव यांच्यावर नवी संघटनात्मक जबाबदारी देण्यात येईल, असे डॉ. जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, चव्हाण यांचे या नियुक्तीबद्दल ज्येष्ठ नेते, आमदार पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील- उंडाळकर, प्रदेश काँग्रेसचे चिटणीस रणजितसिंह देशमुख, राजेंद्र शेलार, बाबुराव शिंदे, जिल्हा काँग्रेसचे खजिनदार बाबासाहेब कदम, कराड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले, हिंदुराव पाटील,विजयराव कणसे, राजनशेठ चिपळूणकर, रफिकशेठ बागवान, रजनीताई पवार, अन्वर पाशा खान, डॉ. रवींद्र झुटिंग, निलेश महाडिक, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक, नरेश देसाई, अॅड. दत्तात्रय धनावडे, मनोज तपासे, संतोष डांगे आदींनी स्वागत आणि अभिनंदन केले.