maharashtra

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर गुन्हा


मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विडणी, ता. फलटण गावच्या हद्दीत असलेल्या शिव ओढा उड्डाणपुलाचे नवीन काम चालू असल्याने जुन्या डांबरी रस्त्यावर सुनील काशिनाथ बुधावले रा. पिराळे, ता. माळशिरस याने त्याच्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एमएच 45 डब्ल्यू 0401 ही अविचाराने, बेदरकारपणे, भरधाव वेगात चालवली. शेतामधून अचानक कुत्रे आडवे आल्याने त्याची मोटरसायकल रस्त्यावरच्या खडीवरून घसरली. या अपघातात त्याच्यामागे बसलेली त्याची आत्या नंदा राजेंद्र चव्हाण वय 40, रा. पिराळे, ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर ही मोटरसायकल वरून खाली पडून जखमी झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करीत आहेत.