अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 3 डिसेंबर रोजी दुपारी पाहून वाजण्याच्या सुमारास वेळे, ता. वाई गावच्या हद्दीत वेळे ते सोळशी जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या सोळशी घाटातील वळणावर विशाल विलास मोरे रा. गुळुंब, ता. वाई याने त्याच्या ताब्यातील अल्टो कार भर वेगात, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवीत असताना वेळे बाजूकडून सोळशी बाजूकडे चाललेल्या रिक्षा क्रमांक एम एच 11 एजी 1028 आणि मोटरसायकल क्रमांक एमएच 11 एव्ही 3554 यांना धडक दिली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून याप्रकरणी विशाल मोरे यांच्या विरुद्ध माधव बाळकृष्ण मोहिते रा. वाई ता. वाई यांनी भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार डी. एस. धायगुडे करीत आहेत.