maharashtra

आमदारकीची टर्म कोर्ट कचेरीत व फरार होण्यात गेली : अजिनाथ केवटे


MLA's term in court office and absconding: Ajinath Kevate
सातारा जिल्ह्यातील अनेक आमदारांनी नावलौकिक प्राप्त केले आहे. पक्ष वाढीसाठी योगदान दिले पण, माण-खटाव भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी तेरा वर्षात अपक्ष, काँग्रेस व भाजप कडून मिळवलेल्या आमदारकीची टर्म आपल्या कर्तबगारीने कोर्ट कचेरीत घालवली, असा थेट आरोप माण चे सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी केला आहे.     

म्हसवड : सातारा जिल्ह्यातील अनेक आमदारांनी नावलौकिक प्राप्त केले आहे. पक्ष वाढीसाठी योगदान दिले पण, माण-खटाव भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी तेरा वर्षात अपक्ष, काँग्रेस व भाजप कडून मिळवलेल्या आमदारकीची टर्म आपल्या कर्तबगारीने कोर्ट कचेरीत घालवली, असा थेट आरोप माण चे सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी केला आहे.                                 काही लोकांची तहान व भूक भागवून स्वतःचे महत्त्व निवडणुकीत वाढवून वाटचाल करणारे आ. गोरे यांच्या विरोधात सर्वच गरीब, कष्टकरी, शेतमजूर आहेत. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याच्या कक्षेत आ. गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण, त्यांना अटक होऊ शकली नाही. त्यांच्या विरोधात माण-खटाव तालुक्यातील तहसिल व पोलीस ठाण्यात अन्यायग्रस्त समाज्याचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भर उन्हात मतदार रस्त्यावर उतरले होते. मतांचा जोगवा मागणारे इतर पक्षातील प्रस्थापित मंडळी या विषयावर बोलत नाही. त्यांचा आ. गोरे यांना अन्यायाबाबत मूक संमती असल्याची भावना अनेक मागासवर्गीय सामाजिक कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत. शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी त्याबाबत मार्मिक विश्लेषण केले आहे. पण, महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षाला जनाची नाही पण मनाची लाज वाटत नाही, असे खेदाने लोकशाही मानणाऱ्या कार्यकर्त्यानी नमूद केले, अशी भावना व्यक्त केली जात आहे.                   आमदारकी म्हणजे सुमारे चार लाख मतदारांचे प्रतिनिधित्व मानले जाते. सध्या दुष्काळी भागातील शेतकरी, जनतेचे प्रश्न विधिमंडळ सदस्यांनी मांडले तर प्रश्नांची सोडवणूक होते. पण, मूलभूत सुविधा बाबत प्रश्न उपस्थित करण्याऐवजी सभागृहाचा वेळ हा अनधिकृत वाळू उपसा बाबत झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला सध्या आमदारच कोर्ट कचेरी मध्ये सापडले आहेत. अनेक गुन्हयाची मालिका त्यांच्या नावावर असल्याने या वादग्रस्त आ. गोरे यांना आदरणीय कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी व श्री सिद्धनाथ सुबुद्धी दयावी असे आम्ही दररोज साकडे घालत आहे.असे ही अजिनाथ केवटे यांनी प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट केले.
माण-खटाव मध्ये भ्रष्टाचाराचे आगार असलेल्या लोकांचा मसीहा अशी प्रतिमा आ गोरे यांची झाली आहे. पैसा, मॅनेज, दहशतवाद या हैट्रीक मुळेच त्यांची विधिमंडळात हैट्रीक झाली आहे. आता चौकार नव्हे तर माजी आमदार अशीच प्रतिमा आ. गोरे यांची होणार आहे. कारण सर्व समाज घटक त्यांच्या बद्दल कमालीचा नाराज झाला आहे. मराठा, मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाज्याचे डोळे उघडले आहेत. ज्यांना आपले मानले तो ओ. बी. सी. समाज सुध्दा दुरावला आहे. याचे त्यांनी भान ठेवावे. काहीजण त्यांची प्रतिमा चांगली रंगवू शकतात पण, कोणाचे चरित्र बिदागी घेऊन रंगवू शकत नाही. हेच आगामी निवडणुकीत सिध्द होणार आहे. आमचा विरोध हा पक्ष किंवा व्यक्तीशी नसून त्या प्रवृत्तीशी लढा आहे. भाजपचे काही जण विषारी साप तर राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष, शिवसेना मध्ये ही दहा चा आकडा असलेले दंश करणारा नाग आहे. इतर रिपब्लिकन व वंचित आघाडी आवाज उठवल्या नंतर गायब होतात. याचाही अनुभव अनेकांना आला असल्याचे दिसून आले आहे, असेही केवटे यांनी सांगितले.
समाजसुधारक महात्मा फुले, छत्रपती शिवराय, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लढा देण्याचे बळ दिले आहे. त्यामुळे संविधानाने दिल्याचा अधिकाराचा वापर केला आहे. आपणही सदविवेक बुध्दी चा वापर करून निर्णय घ्यावा, असेही आवाहन केवटे यांनी सर्व समाज बांधवांना केले आहे.