राजपथावरील पोलीस करमणूक केंद्राच्या परिसरात असणाऱ्या श्री समर्थ बॅटरी या दुकानाला शनिवारी रात्री उशिरा आग लागून सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या आगीमध्ये जीवित हानी झाली नाही.
सातारा शहरामध्ये खाजगी फायनान्स कंपन्या कर्जाच्या नावाखाली अक्षरशः खाजगी सावकारी करत आहेत.
सातारा : श्री. छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही केवळ ऐतिहासिक घटना नव्हती तर भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा दिवस होता. त्यांच्या राज्याभिषेकांमुळे इतिहासाला एक वेगळे वळण मिळाले. महाराष्ट्र म्हणजे स्वाभिमान, देशाभिमान, वैयक्तिक स्वार्थीपेक्षा राष्ट्राच्या हिताला नेहमी प्राधान्य देत आला त्यामुळेच मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले हे रुढ झाले. हे केवळ छत्à...
कराड येथील बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात तसेच प्रवाशांच्यात खळबळ उडाली.
मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विनापरवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी सातारा शहर आणि परिसरातील तब्बल 10 जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 29 हजार 513 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत 18 जणांवर कारवाई केली आहे.
मेढा, ता. जावली येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या खुनाची उकल स्थानिक गुन्हे शाखेने केवळ बारा तासात केली आहे. याप्रकरणी दोघा जणांना जेरबंद करण्यात त्यांना यश आले आहे.
राजापूर (जि. रत्नागिरी) येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा सातारा जिल्ह्यातील पत्रकार आक्रमक झाले. त्यांनी तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. पत्रकारांनी दिलेल्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
जागतिक वारसा स्थळ लाभलेल्या कास पठार परिसरातील अतिक्रमण केलेल्या हॉटेलवर महसूल विभागाने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. मात्र ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली. कारवाईमध्ये पाच हॉटेल सील करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाई संदर्भात तहसीलदारांनी कारवाईचा भाग म्हणून अधिक बोलण्यास स्पष्ट नकार दिला.