सातारा शहरातील दहा जुगार अड्ड्यांवर छापे
29 हजार 513 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; 18 जणांवर कारवाई
पोलिसांनी सातारा शहर आणि परिसरातील तब्बल 10 जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 29 हजार 513 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत 18 जणांवर कारवाई केली आहे.
सातारा : पोलिसांनी सातारा शहर आणि परिसरातील तब्बल 10 जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 29 हजार 513 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत 18 जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील मार्केट यार्ड लगत असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या पाठीमागे असलेल्या बोळात लक्ष्मण सिताराम पवार रा. नुने, ता. पाटण आणि गणेश चंद्रकांत ठोकळे रा. करंजे, सातारा हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 1025 रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत सातारा शहरातील मोळाचा ओढा चौक येथे फिरोज खुदबुद्दीन झारी रा. तामजाई नगर, सातारा आणि विकास तानाजी निकम रा. आंबेदरे, ता. सातारा यांच्याकडून जुगार प्रकरणी ८१० रुपये आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
तिसऱ्या घटनेत कोडोली तालुका सातारा येथील दशरथ रामचंद्र जाधव यांच्या भांड्याच्या दुकानासमोर असलेल्या शेडमध्ये कारवाई करीत निकेतन किशोर पिसाळ रा. करंजे पेठ, सातारा आणि चंद्रकांत चोरगे रा. रविवार पेठ, सातारा यांच्याकडून जुगार प्रकरणी ४ हजार ९७५ रुपये.
चौथ्या घटनेत मंडईचा राजा जुना मोटर स्टॅन्ड येथील शौचालयाच्या आडोशाला कारवाई करीत गुरुप्रसाद शेखर साठे रा. शुक्रवार पेठ, सातारा आणि सतीश रामेश्वर मते रा. मोळाचा ओढा, सातारा यांच्याकडून 5 हजार 522 रुपये.
पाचव्या घटनेत पोवई नाका ते पारंगे चौक कडे जाणाऱ्या रस्त्यावरील गणपती मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुमित परशुराम बनसोडे रा. म्हसवे, ता. सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 945 रुपये आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
सहाव्या घटनेत अजंठा चौक प्रीती हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या टपरीच्या आडोशास जुगार प्रकरणी कारवाई करीत कुमार गुंडीबा गायकवाड रा. विक्रांत नगर, सातारा आणि चंद्रकांत रमेश चोरगे रा. रविवार पेठ, सातारा यांच्याकडून ११७५ रुपये.
सातव्या घटनेत सेवन स्टार इमारत सातारा येथील एम एच 11 चायनीज रेस्टोच्या आडोशाला जुगार प्रकरणी कारवाई करीत दशरथ सखाराम फरांदे रा. गडकर आळी, सातारा आणि गणेश चंद्रकांत ढोकळे रा. करंजे, सातारा यांच्याकडून 1552 रुपये.
आठव्या घटनेत विराज बेकरी कोडोली सातारा येथील पान टपरीच्या आडोशाला कारवाई करीत शुभम सत्यवान कांबळे रा. खेड, तालुका सातारा याच्याकडून 2190 रुपये.
नवव्या घटनेत जुना मोटर स्टॅन्ड येथील सुमित्रा संकुलच्या आडोशाला जुगार प्रकरणी कारवाई करीत तौसीफ उर्फ बबलू सलीम सय्यद रा. गुरुवार पेठ, सातारा, संदीप सर्जेराव शिंदे आणि समीर कच्छी रा. सातारा यांच्याकडून 8804 रुपये.
दहाव्या घटनेत शिवराज पंपाच्या समोर असलेल्या पान टपरीच्या आडोशाला जुगार प्रकरणी कारवाई करीत संतोष सुरेश मेटकरी, रा. विलासपूर, ता. सातारा याच्याकडून 2415 रुपये आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.


