maharashtra

ॲट्रॉसिटी ची तक्रार दाखल करून घेण्यास शहर पोलिसांची टाळाटाळ

व्यावसायिक महेश शिवदास यांचा पत्रकार परिषदेत आरोप

सातारा शहरामध्ये खाजगी फायनान्स कंपन्या कर्जाच्या नावाखाली अक्षरशः खाजगी सावकारी करत आहेत.

सातारा : सातारा शहरामध्ये खाजगी फायनान्स कंपन्या कर्जाच्या नावाखाली अक्षरशः खाजगी सावकारी करत आहेत. कर्ज फसवणुकीची तक्रार असताना ती दाखल करून घेण्यास सातारा शहर पोलीस टाळाटाळ करीत आहेत आणि माझ्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्याचा आरोप करणाऱ्या उपनिरीक्षक शितल जाधव यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ची तक्रार देऊनही ती दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे, असा आरोप साताऱ्यातील कुशनं व्यावसायिक महेश शिवदास यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
येथील शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांच्यावर गुदरलेल्या  प्रसंगाची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली ते म्हणाले 30 ऑक्टोबर 2022 रोजी श्रीराम सिटी फायनान्स कंपनीकडून त्यांच्या चार चाकी वाहनावर त्यांनी कर्ज घेतले होते मात्र संबंधित कंपनीने एस पी फायनान्स कंपनीच्या सचिन पाटील यांना त्यांच्याशी करार नसताना त्यांना धनादेश देण्यास सांगितले .या फसवणुकी संदर्भात मी 1 फेब्रुवारी 2023 रोजी सातारा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेलो होतो त्यांनी लेखी तक्रार देण्यास मला सांगितले . त्यावेळी कंपनीचे संचालक सचिन पाटील यांच्या नातेवाईक महिला पोलीस उपनिरीक्षक शितल जाधव यांनी तक्रार घेण्यास नकार देऊन तुम्ही खोटे गुन्हे दाखल करत आहात असा आरोप माझ्यावर केला व शहर पोलीस स्टेशनच्या पोर्चमध्ये अपमानास्पद वागणूक देऊन पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांना एकत्रित करून भीतीदायक वातावरण तयार केले संग्राम पाटील व शीतल जाधव हे नातेवाईक असल्याने त्यांनी माझी तक्रार दाखल होऊ दिली नाही.
शितल जाधव यांची आता सातारा शहर म्हणून सातारा तालुका पोलीस स्टेशन येथे बदली झाली आहे आमच्यासारख्या दलित समाजाच्या माणसांनी न्यायासाठी कोणाकडे जायचे पोलीस अध्यक्ष समीर शेख यांनाही भेटून या संदर्भात अर्ज देण्यात आला आहे मात्र त्यांच्याकडूनही कोणतीही अद्याप कारवाई झालेली नाही यासंदर्भात जर मला न्याय मिळाला नाही तर यापुढे मी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा शिवदास यांनी पत्रकार परिषदेत दिला.