विनापरवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : विनापरवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोरखळ, ता. सातारा येथे दिनांक 9 फेब्रुवारी रोजी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, बेकायदेशीररित्या बैल गाड्या शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी तसेच प्राण्यांना क्रूरपणे मारहाण केल्याप्रकरणी मोन्या पाटील, ऋषिकेश नलवडे, रोहन पाटील व अन्य आयोजकांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.


