maharashtra

मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा


मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाच्या वेळी हाकलून दिल्याचा राग मनात धरून दि. 9 फेब्रुवारी रोजी पावणे चार वाजण्याच्या सुमारास लिंब फाटा ता. सातारा येथील रस्त्यावर सचिन सदाशिव चोरट रा. कोढवली, लिंब, ता. सातारा यांना मारहाण करीत जबरी चोरी केल्याप्रकरणी शुभम नवनाथ बरकडे, गोरख चंद्रकांत बरकडे दोघे रा. लिंब, ता. सातारा, अभय राजे रा. कोंढवली लिंब, सातारा आणि अब्दुल सिद्धीगी रा. लिंब फाटा सातारा यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार बागवान करीत आहेत.