एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन कपाटातून पावणेदोन लाखाचे दागिने चोरणाऱ्या ओंकार दीपक जाधव वय 19 राहणार सटालेवाडी, तालुका वाई याला वाई पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. याप्रकरणी विद्या दीपक जाधव यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
मानवी जीवनामध्ये सत्कर्म करून पुण्याईचा जर बॅलन्स तुमच्याकडे असेल तर जगात कोणीही तुमचे वाकडे करू शकत नाही. फक्त अहंकार अंगी येऊ देऊ नका. आयुष्यात प्रत्येकाला सुख समाधान आनंद मिळेल, असे प्रतिपादन परम पूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी केले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी अँड जिजामाला नाईक- निंबाळकर, कन्या ताराराजे, इंदिरा राजे समवेत भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील 55 दुष्काळी तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरीव पॅकेजची मागणी केली.
सातारा शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंजवडी (ता. फलटण) येथील पवारवस्तीत घराशेजारील महिलेशी अनैतिक संबधाच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत एका महिलेचा खून झाला.
वेळे (ता वाई) गावच्या हद्दीत गुळूंब रस्त्यावर पुलाच्या भिंतीवर दुचाकी आदळून दोनजण जागीच ठार झाले
"तुझ्या बापाचा नोकर आहे का?" असं म्हणत चक्क एका ट्रॅफिक पोलिसानेच होमगार्डला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील असून याबाबतचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.