एकास मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 22 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अनिल बबन चव्हाण राहणार म्हाडा कॉलनी सदर बाजार सातारा यांना तेथीलच किरण प्रकाश कांबळे यांनी दगडाने मारहाण केली. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक भोसले करीत आहेत.


