एकास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एकास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नगर वाचनालय, राजवाडा जवळ नामदेव धोंडीबा खरात रा. गडकर आळी, शाहूपुरी, सातारा हे त्यांची महिंद्रा गाडी लावून भाडे मिळण्याची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी त्यांचे चुलते शंकर विठ्ठल खरात आणि बजरंग धोंडीबा मेलाट दोघेही राहणार ठोसेघर, ता. सातारा यांनी तेथे येऊन नामदेव खरात यांना दगडाने, हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार सणस करीत आहेत.


