maharashtra

एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा


एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दीपक हरिश्चंद्र पालकर रा. कोटेश्वर मंदिर शेजारी, सातारा यांना त्यांचा भाऊ सुरेश हरिश्चंद्र पालकर यांचे घेतलेले पैसे का देत नाहीस, असे म्हणून सुरज बाळासाहेब घाडगे रा. प्रतापगंज पेठ सातारा, गुरुनाथ साठे रा. शुक्रवार पेठ सातारा आणि तुषार जगताप रा. बुधवार पेठ, सातारा या तिघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार ढमाळ करीत आहेत.