Satara

esahas.com

नागरिकांची लॉकडाऊन काळातील घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी 

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. काम नसल्याने खिशात पैसे नाहीत. अशा परिस्थितीत पालिकेने नोटीस बजावल्या आहेत. उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातल्या नागरिकांची घरपट्टी, पाणी पट्टी माफ करण्याची विनंती केली होती. त्यानुसार शहरातील सर्व नागरिकांची घरपट्टी, पाणी पट्टी माफ करावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

esahas.com

बोरणे घाटात कोसळली दरड; वाहतूक काहीकाळ ठप्प

ठोसेघरकडे जाणार्‍या मार्गावरील बोरणे घाटात पावसामुळे गुरुवारी मध्यरात्री दरड कोसळली असल्याने शुक्रवारी सकाळी या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, वाहनचालकांसह प्रवाशांनी छोठे-छोठे दगड हटविल्याने एकेरी वाहतूक सुरू झाली असून, मोठमोठे दगड अद्याप रस्त्याच्या मधोमधच असल्याने ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.

esahas.com

उरमोडीचे दरवाजे उघडले; वक्र दरवाजातून 2600 क्युसेक पाण्याचा विसर्ग

उरमोडी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असून, या भागातील ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाण्याची आवक वाढल्याने उरमोडीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. उरमोडीचे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून, 13 रोजी सकाळी आठ वाजता उरमोडी वीज गृहातून 400 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. 

esahas.com

मोबाईल चोरल्याप्रकरणी अनोळखी महिलेवर गुन्हा

दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिलेने दुकानातील कामास असलेल्या महिला कर्मचार्‍याचा मोबाईल चोरल्याची घटना शहरातील एका चप्पल दुकानात घडली असून, अनोळखी महिलेच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

पाटणमधील कोविड सेंटर ठरताहेत हुल्लडबाजीचे केंद्र

कोरोनाने पाटण शहरामध्ये चांगलाच तळ ठोकला असून पाटणची साखळी वाढतचं चाललेली आहे. कोरोना बाधित लोकांची सोर पाटण मधील चार कोविड सेंटरमध्रे केली जात आहे. मात्र रा कोविड सेंटर मधील उपद्रवी हुल्लडबाज तरुण इथंही आपल्रा अवगुणांचे चित्रण करुन प्रशासनास नाहक त्रास देत आहेत.

esahas.com

जिल्ह्याला धुवाधार पावसाने झोडपले

सातारा जिल्ह्याला गुरुवारी धुवाँधार पावसाने झोडपून काढले. श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्यापासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने संपूर्ण जिल्हा चिंब झाला आहे. दरम्यान, मांढरेदवी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. 

esahas.com

कोरोनाचा उद्रेक ः जिल्ह्यात 304 बाधित 

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. बुधवारी आतापर्यंत सर्वाधिक 304 रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच दिवसभरात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे. 

esahas.com

यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा

करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यावर भर द्यावा असे आवाहन वाई विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले. 

esahas.com

सरकारने लॉकडाऊनचा निर्णय रद्द करून एसटी सुरू करावी

सातारा : देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकटाने अगदी थैमान घातले असताना त्याला रोखण्यासाठी काही नियोजन नसतानासुध्दा सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्या कालावधीत उपाय योजना करण्यात सरकार पूर्णपणे अपशयी ठरले आहेत. त्यामुळे लोकांचे भूकबळी जाण्यापेक्षा सततचा लॉकडाऊनचा पर्याय रद्द करून शासनाने कोरोना नियंत्रणावर लक्ष द्यावे. तसेच एसटी पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी वंचित आघाडीच्या वतीने डफली आंदोलन करण्यात आले. 

esahas.com

छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईतील गाळे सील

छत्रपती शिवाजी महाराज व्हेजीटेबल अ‍ॅन्ड जनरल मार्केट (भाजी मंडई) रा मार्केटमधील 18 गाळेधारकांची उर्वरित डिपॉझीट रक्कम रुपरे 22,01,700/रेणेबाकी होती. राबाबत नगरपरिषदेने वारंवार सूचना देवूनही गाळेधारक शिल्लक डिपॉझीटची रक्कम भरत नव्हते. त्रामुळे त्रांना 22 जून 2020 रोजी नोटीस देवून उर्वरित डिपॉझीट रक्कम भरणेबाबत कळविण्रात आलेले होते. दरम्रान एका गाळाधारकाने रक्कम भरल्राने उर्वरित 17 गाळे सील करण्रात आले आहे. सदर कारवाई पोलिस बंदोबस्तात करण्रात आले आहे.