खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील विक्रम मोहिते यांची आ.रोहितदादा पवार विचारमंचच्या खंडाळा तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील विक्रम मोहिते यांची आ.रोहितदादा पवार विचारमंचच्या खंडाळा तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल विक्रम मोहिते याचा आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष आदेश भापकर,राष्ट्रवादी शिरवळ शहर अध्यक्ष चंद्रकांत मगर ,उपसरपंच सुनिल देशमुख.शिरवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष समीर काझी , राष्ट्रवादी विद्यार्थी शिरवळ शहर संघटनेचे पदाधिकारी प्रतिक मगर. सुमित पानसरे,आकाश मगर,आकाश कबुले आदी उपस्थित होते.


