selection

esahas.com

सातारा जिल्ह्यात 50 ग्रामपंचायती झाल्या बिनविरोध

सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 133 ग्रामपंचायत पैकी 50 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर 18 ग्रामपंचायती अंशतः बिन विरोध झाल्या आहेत. प्रत्यक्ष निवडणूक 64 ग्रामपंचायतीमध्ये लागली असून थेट सरपंचाच्या 57 पदासाठी 146 जन रिंगणात आहेत. 63 गावातील 380 जागांसाठी 817 उमेदवार रिंगणात असल्याचे ग्रामपंचायत विभागातून सांगण्यात आले.

esahas.com

सातारा जिल्हा परिषद आर्थिक पतसंस्था निवडणुक प्रक्रियेत ५७ पैकी ४७ अर्ज अपात्र होणार ?

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील नियम २३ अन्वये प्रशांत तायडे यांनी दाखल केलेले अपील सहकार विभागाने मान्य केले तर ४७ जणांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. सहकार विभाग उच्च नायल्याच्या निकालाचा अवमान करून प्रस्थापितांच्या बाजूने निकाल देणार का? यावर जिल्हा वासियांकडून तर्कवितर्क नोंदवले जात आहेत

esahas.com

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी सातारच्या तिघांची निवड

कै. मारुती सावजी लांडगे कुस्ती संकुल, (भोसरी) पिंपरी चिंचवड येथे झालेल्या ज्युनियर फ्री स्टाईल मुले, ज्युनियर ग्रीको रोमन मुले व ज्युनियर फ्री स्टाईल मुली राज्यस्तरीय निवड चाचणीत सातारचे सुमित गुजर (खातगुण), महेश कुंभार (बुध) आणि साक्षी पाटील यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांची बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

esahas.com

ग्रंथमित्र पॅनलची निवडणुकीत बाजी

श्री. छ. प्रतापसिंह महाराज नगर वाचनालयाच्या निवडणुकीत सत्ताधारी ग्रंथमित्र पॅनलने सर्वच म्हणजे बाराही जागा जिंकून विरोधकांना धोबीपछाड दिला . विरोधकांनी मिळवलेल्या मतांनी सत्ताधारी गटाला आत्मपरीक्षण करायला लावले आहे.

esahas.com

वडोली-निळेश्वरमध्ये शालेय व्यवस्थापन समिती निवडीवरुन मारामारी

वडोली-निळेश्वर, ता. कराड येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्य निवडीवरून झालेल्या वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरु असुन आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

esahas.com

आ. रोहितदादा पवार विचार मंचच्या खंडाळा तालुकाध्यक्षपदी विक्रम मोहिते

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील विक्रम मोहिते यांची आ.रोहितदादा पवार विचारमंचच्या खंडाळा तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.