‘कर्मवीरांनी आम्हाला कष्टांचा संस्कार दिला. त्यामुळे आम्हाला कधीही शेण काढण्याची लाज वाटली नाही. आम्ही विहिरी खोदल्या, भाज्या विकल्या, खडी फोडली त्यामुळे आमचे जीवन चांगले घडले. भाऊराव पाटील यांनी संस्थेची उभारणी केली. पुढच्या काळात त्यांच्या संस्कारात वाढलेल्या मुलांनी संस्थेचा प्रचंड विस्तार केला. आम्ही कॉलेजला शिक्षक झालो तेव्हा हिंमतीने कामे केली. आज बाडसारखी मुले स्वतःचा व्यवसाय करून मोठी प्रगती करतात. शिक्षकाला दुसरे काय लागते? विद्यार्थी चांगले घडल्याचा आनंद शिक्षकास मोठा असतो,’ असे विचार
मद्यधुंद पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून आईलाही काठीने बेदम मारहाण केली असल्याची घटना जावळी तालुक्यातील सोनगाव येथे घडली. याप्रकरणी आरोपी विनोद बबन शिंदे (वय 38, रा. सोनगाव) याच्या विरोधात कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंबाटकी घाटामध्ये आपले कर्तव्य बजावणार्या आणि महामार्गावर वाहतुकीचे नियमन करण्यासाठी गस्त घालणार्या भुईंज येथील महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटक राज्य एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणार्या एका प्रवासी व्यक्तीला गंभीर स्थितीत असताना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिल्यामुळे त्या प्रवासी व्यक्तीचे प्राण वाचण्यास मदत झाली. महामार्ग पोलिसांच्या या कर्तव्यतत्परतेचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
‘जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सर्व यंत्रणांनी कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावीपणे काम करावे,’ अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
‘परळी दर्याखोर्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला परळी आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचार्यांनी मोठ्या साहसाने तोंड देत हद्दपार केला आहे. यामध्ये ग्रामस्थांचेही सहकार्य होतेच, याच पार्श्वभूमीवर परळी येथे लसीकरणाचा शुभारंभ झाला.
‘महिला सबलीकरणासाठी आजही अनेक उपक्रमांची आवश्यकता असून समाजातील सक्षम आणि आत्मनिर्भर स्त्रीवर्गाने यासाठी पुढे यावे,’ असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. चित्रा दाभोलकर यांनी केले.
सातारा : आसले, ता. वाई येथील ओंकार चव्हाण यांचा निर्घृण खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याप्रकरणातील सुत्रधार गुंड अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव घटनेपासून पोलिसंना गुंगारा देत होता. अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाब राज्यातील भटिंडा शहरातील एका हॉटेलमध्ये बंटी जाधव व त्याचा साथीदार नखील शिवाजी मोरे वय 24 वर्षे रा. फुलेनगर भुईंज ता. वाई यांच्या मुसक्या आवळल्या. ...
सातारा येथील ऐतिहासिक सैनिक स्कूलच्या अंतर्गत विकास आणि अधिक सुसज्जतेसाठी भरीव निधीची गरज होती. हा प्रश्न आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुटला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा सैनिक स्कूलसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हावासीयांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले आहेत.
‘ती’ सध्या काय करते?, असा प्रश्न आता विचारायची गरज नाही. कारण, शिक्षणाची गंगा खेडोपाड्यापर्यंत पोहोचल्यानंतर अन् महिलांना ती दारे खुली झाल्यापासून ‘ती’ आता सक्षम झालीय. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती आज प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसतेय. प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलीही यात कुठे मागे दिसत नाहीत. अन् याचं उत्तम उदाहरण म्हणजे बांबवडेच्या ‘तेजस्वी’नं ‘पॅरा मिलिटरी’त पहिल्याच प्रयत्नात मारलेली उत्तुंग भरारी...त्याच ‘तेजस्वी’च्या कहाणीचा आज 8 मार्च ‘जागतिक महिला दिना’निमित्त घेतलेला हा अ
युद्धाला तोंड फुटताच जसे आघाडीवरील सैन्य शत्रूला भिडते तसेच गेले वर्षभर सुरू असलेल्या कोरोना युद्धात अगदी फ्रंटवर बिनीची फौज बनून कोण लढलं असेल तर पीपीई कीट घालून कोविड रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी. सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनेक पुरुष सहकार्यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक महिला डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन, परिचारिका, वर्ग-4 कर्मचारी यांनी धोका पत्करून ही लढाई लढताना अनेक कोविड रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे.