येथील गुरुवार पेठेतील कमानी हौदाजवळील बंद घर फोडून चोरट्यांनी २२ हजार रुपयांचे साहित्य चोरुन नेले.
सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पथकाने काल दिवसभरात शहराच्या विविध भागात छापे टाकत सुमारे २० हजारांची रोकड जप्त करत चौदा जणांवर गुन्हा नोंदविला. गुन्हा नोंद असणाऱ्यांमध्ये कालच तडीपार केलेल्या समीर कच्छी याचाही समावेश आहे.
घरासमोर मैत्रीणींसमवेत खेळत असताना अल्पवयीन बालिकेशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पाठलाग करत फोटो तसेच व्हिडिओ शुटींग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शैलेश प्रभाकर शेटे (रा. जीवनज्योत हॉस्टिपल जवळ) याच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आले.
दिवाळीसाठीची रोषणाई करताना उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा शॉक लागल्याने चिमणपूरा पेठेतील कारंडबी नाका परिसरात राहणाऱ्या सुनील तुकाराम पवार (वय ४०) यांचा काल रात्री मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत पवार यांची पत्नी आणि दोन मुले जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
उंब्रज, ता. कराड येथे पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रज येथे दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकजण जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी 31 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
कोयत्याचा धाक दाखवत मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आंतर जिल्हा सराईत टोळीला जेरबंद करण्यात शिरवळ पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील सर्व संशयित एक महिन्यापासून फरार होते. संशयित तिघांकडून आठ गुन्हे उघड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भोसगाव ता. पाटण येथील ढेबेवाडी वनक्षेत्रात शिकारीसाठी आलेल्या टोळीला वनविभागाच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. सदर कारवाईत वनविभागाने संशयितांकडून ६ जिवंत हातबॉम्ब, २ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शनिवारी ३० रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. तर आज रविवारी ३१ रोजी सकाळी त्या परिसरात २ रानडुक्करे मृतावस्थेत आढळून आली आहेत.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाला. यामध्ये युवा तालुकाध्यक्षपदी मयूर चव्हाण, तर युवा तालुका उपाध्यक्षपदी शिवम पाटील, कराड तालुका उपाध्यक्षपदी अमर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
येथील नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान आणि "स्वच्छ सर्वेक्षण 2022" अंतर्गत सिंगल युज प्लास्टिक आणि 6 कंपार्टमेंट याबाबत प्रभाग क्रमांक 1 व 3 मध्ये मिटींग घेण्यात आली. तसेच 75 मायक्रोन पेक्षा कमी प्रतीच्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी कराड शहरातील नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात आले.