maharashtra

बळीराजा शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकारी निवडी संपन्न


Election of young office bearers of Baliraja Shetkari Sanghatana completed
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाला. यामध्ये युवा तालुकाध्यक्षपदी मयूर चव्हाण, तर युवा तालुका उपाध्यक्षपदी शिवम पाटील, कराड तालुका उपाध्यक्षपदी अमर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

कराड : बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाला. यामध्ये युवा तालुकाध्यक्षपदी मयूर चव्हाण, तर युवा तालुका उपाध्यक्षपदी शिवम पाटील, कराड तालुका उपाध्यक्षपदी अमर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी ३१ रोजी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी निवडीचे पत्र दिले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनिल कोळी, युवाध्यक्ष विश्वास जाधव, उत्तम आण्णा खबाले उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बळीराजा शेतकरी संघटना नेहमीच आक्रमक भूमिका घेत असते. तसेच ऊस आंदोलन, शेती संदर्भातील विविध प्रश्न, विजेचा प्रश्न दुध आंदोलन आदी. आंदोलने करत असते. अनेक तरुण, युवक बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करण्यास पुढे येत आहेत. त्यानुषंगाने सदरच्या निवडी करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिली. दरम्यान, आगामी काळात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणार असल्याचे नवनियुक्त युवा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.