सध्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडत आहेत. मात्र, कोरोना अद्यापही पूर्णपणे गेलेला नसून नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. शिवाय, मास्कचाही वापर करताना दिसून येत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका संभवत असल्याने नगरपालिकेकडून शहरातील बाजारपेठेसह शहरातील मुख्य रस्ते सॅनिटायझ करून घेण्यात येत आहेत.
सातारा सर्व दुचाकी वाहनांसाठी एमएच 11-DE मालिका 0001 ते 9999 पर्यंत संगणकीय वाहन 4.0 प्रणालीवर 3 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सातारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यात मतदार नोंदणी पुररिक्षण कार्यक्रम 2022 मोहिमेस आरंभ झाला असून त्यानुसार एकत्रीकृत प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्हय़ातील 18 वर्षांपुढील नवीन मतदारांनी नोंदणी करावी. यासाठी नोव्हेंबर महिन्यात 13, 14, 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मोहिम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
सदर बझार येथील हनुमान मंदिर याठिकाणी काही समाजकंटकांकडून हनुमान मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मूर्ती विटंबना करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर भारतीय जनता पार्टी व हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व त्यांचे सहकारी यांनी त्या ठिकाणी जाऊन दुग्धाभिषेक करून मूर्तीचे शुद्धीकरण केले व महाआरती करण्यात आली.
ऐतिहासिक शाहूनगरीत वसुबारसच्या निमित्ताने येथील पंचपाळे हौद येथे गोधनाचे पारंपारिक पध्दतीने पूजन करण्यात आले. वसुबारसच्या पूजेने साताऱ्यात दीपोत्सवाचा अर्थ त दिवाळीचा जल्लोष सुरू झाला असून सातारकरांचा सुध्दा दिवाळी खरेदीचा उत्साह उतू जाऊ लागला आहे. राजपथासह वर्दळीच्या मोती चौकाला आज जत्रेचे स्वरूप आले होते.
राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दि. १५ ऑक्टोंबर पासून ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. मात्र आज १५ दिवस उलटूनही काही कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नाही. ही बाब ऊस दर नियंत्रण कायदा १९६६ चा भंग करणारी आहे.
येथील भारतीय स्टेट बँक, कराड ट्रेझरी शाखेत शेतकरी व पेन्शन धारकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथील अधिकारी व कर्मचारी पेन्शन धारकांशी उद्धट वागत असून बँकेचे वाचमनही पेन्शन धारक व शेतकऱ्यांना ढकलून बाहेर काढतात. बँकेतील अधिकाऱ्यांची मनमानी सुरु आहे.
देशातील एक आदर्श बँक असा नावलौकिक असलेल्या बँकेवर संचालकपदाच्या हव्यासापोटी तथ्यहीन आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी बँकेवर आरोप करणाऱ्यांच्या फसवेगिरीला मतदार थारा देणार नाहीत. मी संघर्षातून वर आलो आहे. संघर्ष मला नवीन नाही.
सातारा शहराचा समतोल विकास साधण्यास, सातारा विकास आघाडी नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. विकासामध्ये दुजाभाव न करता, आवश्यक कामात सातत्य ठेवून नागरीकांचे हित जोपासत, विकास पर्व उभे करणारी सुविधा ही नागरीकांची आघाडी आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
घरासमोरील मोकळ्या जागेत पाईप टाकण्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तिन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.