maharashtra

मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्‍हा


Crimes against three in assault case
घरासमोरील मोकळ्या जागेत पाईप टाकण्‍याच्‍या कारणावरुन झालेल्‍या वादानंतर मारहाण केल्‍याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात तिन जणांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

सातारा : घरासमोरील मोकळ्या जागेत पाईप टाकण्‍याच्‍या कारणावरुन झालेल्‍या वादानंतर मारहाण केल्‍याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात तिन जणांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

शनिवार पेठेत वर्षा शिवाजी गडकरी या राहण्‍यास असून ता. २८ रोजी त्‍या घरासमोरील मोकळ्या जागेत पाईप टाकत होत्‍या. या कारणावरुन वर्षा आणि शिवाजी गडकरी यांच्‍याशी संगिता सुर्यकांत गडकरी, सुर्यकांत भानुदास गडकरी, सोमनाथ सुर्यकांत गडकरी यानी वाद घालण्‍यास सुरुवात केली. वादानंतर त्‍या तिघांनी वर्षा, शिवाजी व आणखी एकास मारहाण केली. याची तक्रार वर्षा गडकरी यांनी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात नोंदवली असून तिघांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. तपास हवालदार इंगवले हे करीत आहेत.