maharashtra

साताऱ्यात घरफोडी


Burglary in Satara
येथील गुरुवार पेठेतील कमानी हौदाजवळील बंद घर फोडून चोरट्यांनी २२ हजार रुपयांचे साहित्‍य चोरुन नेले.

सातारा : येथील गुरुवार पेठेतील कमानी हौदाजवळील बंद घर फोडून चोरट्यांनी २२ हजार रुपयांचे साहित्‍य चोरुन नेले.
कमानी हौदाच्‍या पाठीमागील बाजूस नईम नजीर शेख हे राहण्‍यास आहेत. ता. २९ रोजी त्‍यांचे बंद घर चोरट्यांनी फोडत आतील १० हजारांचा स्‍मार्ट टिव्‍ही, १० हजारांचे तांब्‍यांची भांडी, २ हजारांची पातेली असा सुमारे २२ हजाराचे साहित्‍य चोरुन नेले. याची तक्रार शेख यांनी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात नोंदवली असून तपास हवालदार सणस हे करीत आहेत.