maharashtra

कराड पालिकेतर्फे कमी प्रतीच्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी प्रबोधन


Prabodhan to avoid use of low quality plastic by Karad Municipality
येथील नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान आणि "स्वच्छ सर्वेक्षण 2022" अंतर्गत सिंगल युज प्लास्टिक आणि 6 कंपार्टमेंट याबाबत प्रभाग क्रमांक 1 व 3 मध्ये मिटींग घेण्यात आली.  तसेच 75 मायक्रोन पेक्षा कमी प्रतीच्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी कराड शहरातील नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात आले.

कराड : येथील नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान आणि "स्वच्छ सर्वेक्षण 2022" अंतर्गत सिंगल युज प्लास्टिक आणि 6 कंपार्टमेंट याबाबत प्रभाग क्रमांक 1 व 3 मध्ये मिटींग घेण्यात आली. तसेच 75 मायक्रोन पेक्षा कमी प्रतीच्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी कराड शहरातील नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात आले.
यामध्ये नागरिकांनी घरातील कचरा 6 प्रकारे (ओला, सुका, घातक, इ-कचरा, प्लॅस्टिक, कागद) विलगिकरण करून दिल्याने त्याचे व्यवस्थापन कसे होते, या बाबत मिटींगमध्ये माहिती देण्यात आली. तसेच शहरात दिवाळी सण फटाके विरहित करण्याचे आवाहनही नगरपालिकेकडून करण्यात आले आहे. शहरातील रुक्मिणी नगर, बुधवार पेठ येथे सदर मिटिंग घेण्यात आली. तसेच संपूर्ण कराड शहरातील हॉस्पिटलमध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे रुग्ण आहेत का? याचीही माहिती घेण्यात आली. त्यामध्ये एकही रुग्ण आढळला नसल्याचे नगरपालिकेकडून सांगण्यात आले.