साताऱ्याहून पुण्याकडे जात असताना खंबाटकी बोगद्यानजीक धोम बलकवडी कॅनॉलजवळील उतारावर दुचाकीस्वार सचिन कैलास गिरमे रा. सासवड, जि. पुणे हा घसरून पडला. त्यावेळी पाठीमागून येणारा मालट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत या अपघातातील दुचाकी पोलिसांनी रस्त्यावरून बाजूला घेत मृतास रुग्णवाहिकेमधून खंडाळा रुग्णालयात पाठवले. दोन्ही अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाले.
फलटण ग्रामीण पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत फलटण तालुक्यातील राजाळे येथे हातभट्टीची दारू बेकायदा आणि विनापरवाना विक्री करताना आढळून आलेल्या 31 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत सहा लिटर दारूसाठाही जप्त करण्यात आला आहे.
समाजविघातक कृत्य करणार्या कराड व मेढा शहरातील दोन टोळ्यांमधील 13 जणांना आज तडीपार आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले आहेत.
सातारा-कोरेगाव मार्गावर पोवई नाका परिसरातील राजधानी सातारा या सेल्फी पॉईंटचे मंगळवारी शानदार लोकार्पण करण्यात आले. कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले.
देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या सहकुटुंब सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर गेल्या होत्या. महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन त्या मंगळवारी पुण्याकडे निघाल्या होत्या. पुण्याकडे जात असताना त्या सकाळी 11 च्या सुमारास सातारा येथील सर्किटवर पोहचल्या.
देशातील केंद्र सरकारची अवस्था केविलवाणी असून त्यांनी भारतातील जनतेची अवस्थाही केविलवाणी करुन टाकली 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या सात वर्षांत देशातील गोरगरीब जनतेकडून इंधन दरवाढीच्या नावाखाली 23 लाख कोटींची वसुली केली ही एक प्रकारे जनतेची लूट असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
सातारा शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने नागरिकांची कुचंबणा होतच असते. मात्र काही ठिकाणी असलेली स्वच्छतागृहे पालिकेकडून देखभाल, दुरुस्तीअभावी पडून आहेत. मल्हारपेठेतील नगरपालिका शॉपिंग सेंटर येथील स्वच्छतागृहाची अशीच दूरवस्था झाली असून ते तातडीने दुरुस्त करावे, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश मोरे यांनी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ऊसा व्यतिरिक्त पैसे मिळवून देणारे दुसरे पीक नसल्याने यावरच येथील लोकांचे जीवन अवलंबून आहे. गेल्या चार वर्षात साखरेचे दर जवळपास 1 हजार रुपयांनी वाढले. मात्र, ऊस दर 100 रुपयांनीही वाढला नाही. साखरेचे दर वाढल्यावर कारखानदारांनी स्वतःहून त्या पटीत किमान 500 ते 600 रुपये दर द्यायला हवा होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थिती लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनात विकासाभिमुख भूमिका वठवावी. आपला देश जगाच्या पातळीवर आर्थिक, शैक्षणिक व आरोग्याच्या बाबतीत मागे आहे. आज जे देश प्रगत आहेत; ते शिक्षण आणि आरोग्य गुंतवणूक म्हणून करतात. म्हणून ती प्रगत राष्ट्रे आहेत. आपण शिक्षण व आरोग्य अनुत्पादन खर्च समजतो, त्यामुळे आपली प्रगती कमी असून शिक्षण आणि आरोग्याची गुंतवणूक केली; तरच राष्ट्र प्रगत बनते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील विनायक विजय हाके एका पोल्ट्रीफार्मच्या टेम्पोवर चालक आहेत. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते बोरगाव येथून अंडी घेऊन सातारला आले होते. मध्यरात्री त्यांनी सातारा येथील मंगळवार पेठेत अंडी दिली. त्याचे ५३ हजारांचे पेमेंट घेतले आणि टेम्पो घेवून पुन्हा बोरगावकडे निघाले. यावेळी त्यांच्यासमवेत एकजण सहकारी होता.