maharashtra

अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या तरुणावर कारवाई


Action against youth selling liquor illegally
फलटण ग्रामीण पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत फलटण तालुक्यातील राजाळे येथे हातभट्टीची दारू बेकायदा आणि विनापरवाना विक्री करताना आढळून आलेल्या 31 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत सहा लिटर दारूसाठाही जप्त करण्यात आला आहे.

फलटण : फलटण ग्रामीण पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत फलटण तालुक्यातील राजाळे येथे हातभट्टीची दारू बेकायदा आणि विनापरवाना विक्री करताना आढळून आलेल्या 31 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत सहा लिटर दारूसाठाही जप्त करण्यात आला आहे.
राजाळे, ता. फलटण गावच्या हद्दीत विशाल वसंत खरात (वय 31, रा. राजाळे, ता. फलटण) याने त्याच्याकडे असलेली हातभट्टी दारू बेकायदेशीररीत्या 50 रुपये प्रति लिटर दराने खरेदी करून विक्री करून व बेकायदेशीर साठा करताना सापडल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पो.उ.नि. अरगडे करीत आहेत.