maharashtra

राजधानी सातारा सेल्फी पॉईंटचे शानदार लोकार्पण

वेदांतिका राजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

Great Dedication of Capital Satara Selfie Point
सातारा-कोरेगाव मार्गावर पोवई नाका परिसरातील राजधानी सातारा या सेल्फी पॉईंटचे मंगळवारी शानदार लोकार्पण करण्यात आले. कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले.

सातारा : सातारा-कोरेगाव मार्गावर पोवई नाका परिसरातील राजधानी सातारा या सेल्फी पॉईंटचे मंगळवारी शानदार लोकार्पण करण्यात आले. कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी नगर विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक मोने, स्वीकृत नगरसेवक अविनाश कदम, पक्षप्रतोद अमोल मोहिते, नगरसेविका दीपलक्ष्मी नाईक, लीना गोरे, शेखर मोरे पाटील, नगरसेवक धनंजय जांभळे, भाजप महिला आघाडीच्या सुवर्णाताई पाटील, बाळासाहेब महामूलकर, माजी नगरसेवक प्रकाश बडेकर यावेळी उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून राजधानी सातारा हा सेल्फी पॉईंट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने टपाल कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत असणाऱ्या सातारा कोरेगाव मार्गावर विकसित करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी एका छोटेखानी कार्यक्रमात वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते या सेल्फी पॉईंटचे लोकार्पण करण्यात आले. सातारा शहरात एक प्रसिद्ध सेल्फी पॉईंट असावा या संकल्पनेतून राजधानी सातारा हे ठिकाण विकसित करण्यात आल्याचे वेदांतिकाराजे यांनी सांगितले. शिवेंद्रसिंहराजे यांचे चिरंजीव रुद्रनीलराजे यांच्यासमवेत वेदांतिकाराजे यांनी पहिला सेल्फी काढला. या छोट्याशा कार्यक्रमातही रुद्रनीलदाजे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. अनेक तरुणांनी रूद्रनील यांच्यासमवेत सेल्फी काढण्याची हौस भागवून घेतली.