मल्हारपेठेतील स्वच्छतागृह दुरुस्त करण्याची मागणी
शहर शिवसेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : 20 नोव्हेंबरपर्यंत दिली मुदत
सातारा शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने नागरिकांची कुचंबणा होतच असते. मात्र काही ठिकाणी असलेली स्वच्छतागृहे पालिकेकडून देखभाल, दुरुस्तीअभावी पडून आहेत. मल्हारपेठेतील नगरपालिका शॉपिंग सेंटर येथील स्वच्छतागृहाची अशीच दूरवस्था झाली असून ते तातडीने दुरुस्त करावे, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश मोरे यांनी केली आहे.
सातारा : सातारा शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने नागरिकांची कुचंबणा होतच असते. मात्र काही ठिकाणी असलेली स्वच्छतागृहे पालिकेकडून देखभाल, दुरुस्तीअभावी पडून आहेत. मल्हारपेठेतील नगरपालिका शॉपिंग सेंटर येथील स्वच्छतागृहाची अशीच दूरवस्था झाली असून ते तातडीने दुरुस्त करावे, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश मोरे यांनी केली आहे.
याबाबत मोरे यांच्यासह शिवसेना उपशहरप्रमुख अभिजित सपकाळ, गणेश अहिवळे, विभागप्रमुख सुमित नाईक, शाखाप्रमुख अमोल खुडे, अमोल पवार, प्रथमेश बाबर, सयाजी शिंदे यांनी नागरिकांसमवेत मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सातारा शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह राजकीय वरदहस्ताने पाडण्यात आलेली आहेत. उभारलेल्या स्वच्छतागृहांची दुरुस्तीची काम केली नाहीत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागते हे नगरपालिकेला अशोभनीय आहे. मल्हारपेठ येथील नगरपालिका शॉपिंग सेटर शेजारी (क्लासिक हॉर्न लगत) असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह हे परिसरातील नागरिकांची गरज ओळखून उभारले गेले आहे. मात्र सदरचे शौचालय गेले कित्येक वर्षे पडझड झालीय.
त्याबाबत वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेच्या प्रशासनाला निदर्शनास आणून दिले आहे. मात्र, शौचालयाचे दुरूस्ती, रंगरंगोटी, दिवाबत्तीची सुविधा देणे आवश्यक असताना आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे. पालिका शासनाने दि. 20 नोव्हेंबर 2021 पर्यंत स्वच्छतागृह दुरुस्त करुन ते खुले करावे, शहर शिवसेनेमार्फत घरोघरी जाऊन निधी संकलन स्वच्छतागृह दुरुस्त करुन नागरिकांसाठी ते खुले केले जाईल, असा इशारा निलेश मोरे यांनी दिला आहे.


