Satara

esahas.com

जीप कालव्यात कोसळली; तीनजण गंभीर

बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान महाबळेश्वरहुन वाईला येणारी जीप (एमएच ११ एके ८२१५) किसन वीर महाविद्यालयाच्या पुढे उतारावरून भरधाव वेगात येत असताना या जीपने एका दुचाकीला मागून धडक दिली. यानंतर रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिलेलाही ठोकरले. नंतर ही जीप धोम उजव्या कालव्याच्या कठड्याला धडकून कालव्यात पडली.

esahas.com

वडोली-निळेश्वरमध्ये चोरट्यांकडून सुमारे दोन लाखाचे दागिने लंपास

वडोली-निळेश्वर ता. कराड येथे चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचे दागिने लंपास केले. मंगळवारी ९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना  घडली. दरम्यान, ग्रामस्थांना चोरट्यांची चाहूल लागताच त्यांनी चोरट्यांचा पाठलागही केला. परंतु,  अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. यामध्ये प्रितमकुमार शामराव पवार यांच्या घरातून  २ लाख २०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे

esahas.com

जुगार अड्ड्यावर छापा; फलटण येथे बारा जणांवर गुन्हा

तालुक्यातील खटकेवस्ती गावच्या हद्दीत वड्याचा माळ या शिवारात ऊसाच्या शेताजवळ आंब्याच्या झाडाखाली चालणार्‍या जुगार अड्ड्यावर मंगळवारी पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांनी मोबाईल व जुगाराचे साहित्य असा 77 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 12 जुगार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

दुचाकीची चोरी

जनार्दन आनंदराव चव्हाण (वय 72, रा. राधिका रोड, सातारा) यांनी त्यांची दुचाकी क्र. एमएच 11 बीसी 7741 ही एसटी स्टॅन्डमध्ये लावली होती. अज्ञात चोरट्याने बनावट चावीने ही दुचाकी चोरून नेली.

esahas.com

जाचहाट प्रकरणी दोघांवर गुन्हा

पतीचे काम सुटल्याने घर खर्चासाठी माहेरहून पैसे आणावेत, यासाठी विवाहिता प्रियांका कुंडलिक सोळवंडे (वय 33, रा. करंजे पेठ, सातारा) यांचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासूवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

esahas.com

रिक्षा चालकाच्या डोक्यात रॉड मारून जबरी चोरी

राजवाड्यावर प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या तीन अनोळखी युवकांनी रिक्षा चालकाच्या डोक्यात रॉड मारून त्यांची रिक्षा पळविल्याची घटना सातारा तालुक्यातील सैदापूर येथे दि. 8 रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली.

esahas.com

भांडणे सोडविण्यासाठी आलेल्याच्या डोक्यात फरशी घालून खुनाचा प्रयत्न

हॉटेल चालकाशी हुज्जत घालत असताना त्यामध्ये पडलेल्या ग्राहकावर दोघांनी फरशी डोक्यात घालून खुनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

सुमो गाडीतून स्फोटक कांड्या वाहतूक करणार्‍या दोघांवर गुन्हा

चारचाकी वाहनातून स्फोटकांची वाहतूक होत असल्याची माहिती सातारा अँटी टेररिस्ट सेलच्या (एटीसी) पथकाला मिळाली. त्यानुसार पथक तयार करुन कोरेगाव तालुक्यातील शेंदुरजणे येथे एक सुमो संशयास्पदरीत्या पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थांबवली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीन कांड्यांचा साठा होता.

esahas.com

आटाळी, शिवथर येथे विनापरवाना वृक्षतोड केल्यावरून चौघांवर कारवाई

दि. ८ नोव्हेंबर रोजी आटाळी गावच्या हद्दीत आकाश बाचल यांच्या जमिनी मध्ये विनापरवाना वृक्षतोड सुरू असल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असता अतित, ता. सातारा येथील बाळासाहेब लोहार या लाकूड व्यापाऱ्याकडून बेकायदेशीर विनापरवाना वृक्षतोड सुरू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी आकाश बाचल आणि बाळासाहेब लोहार या दोघांवर वन विभागाच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

esahas.com

तुळशीच्या लग्नानंतर ' शुभमंगल ' ची लगबग होणार सुरु

वंशाचा दिवा हवा म्हणून गर्भपातासारखे प्रकार समाजात सर्रासपणे होतात. मात्र, याचे भयंकर परिणाम आज समाजात पहायला मिळत आहेत. मुलांना लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. विशेष करून ग्रामीण भागात बेरोजगार व शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे अव़घड झाले आहे. यामुळे लग्न करून देण्याची ऐपत नसलेल्या कुटुंबातील मुलींना पैसे देऊन लग्न केली जात आहेत.