Satara

esahas.com

सातारा - कास मार्गावर लागलेल्या वणव्यात एक एकर क्षेत्र भस्मसात

सातारा- कास मार्गावर आज सायंकाळी उशिरा अचानक लागलेल्या वणव्यात सुमारे एक एकर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

esahas.com

युवतीच्या अपहरणप्रकरणी चार जणांवर गुन्हा

युवतीची लग्नासाठी कोणतीही इच्छा नसताना तिचे शहर परिसरातून जबरदस्तीने ओमनी गाडीतून अपहरण करणे तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत तिला जातीवरून अपमानीत केल्याप्रकरणी युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन शाहूपुरी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

पुणे बंगलोर महामार्गावर उभ्या मालट्रकला इनोव्हाची धडक : दोन महिला ठार, चार जखमी

पुणे- बंगलोर महामार्गावर भुयाचीवाडी येथे उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या इनोव्हा कारने जोराची धडक दिली. या धडकेत दोन महिला जागीच ठार झाल्या असून अन्य चारजण जखमी झाले आहेत.

esahas.com

दरोड्याचा गुन्हा ४८ तासात उघडकीस

दरोड्याचा गुन्हा ४८ तासात उघडकीस आणून पाच दरोडेखोरांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com

कराडात एसटी कर्मचार्‍यांनी मुंडन करून नोंदवला निषेध

कराड बस स्थानकासमोर कर्मचार्‍यांनी मुंडन करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. तसेच ढफ, टाळ, मृदूंगाच्या वाद्यात कर्मचाऱ्यांनी गोंधळही घातला. त्याचबरोबर संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणाऱ्या महामंडळाच्या अधिकार्यांसह सरकारचाही घोषणाबाजी करून निषेध नोंदवला.

esahas.com

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी सुरू केलेली बेकायदेशीर वाहतूक बंद करा

सध्या, राज्यभर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी संप पुकारला आहे. परंतु, त्यांचे आंदोलन मोडीत  काढण्यासाठी खाजगी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून ही बेकायदेशीर वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.  

esahas.com

माहेश्वरी चॅरिटेबल फाऊंडेशन ट्रस्टच्या अन्नदान सेवा उपक्रमाचे पुनश्‍च: हरीओम

माहेश्‍वरी चॅरिटेबल फाऊंडेशन ट्रस्ट च्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायीत्वाच्या भावनेतून सुरु असलेला एक अभिनव उपक्रम म्हणजे सातारा सिव्हल हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकां करीता वर्षातील 365 दिवस सुरु असणारा अन्नदान महायज्ञ. कोरोनाच्या संकटामुळे स्थगित असलेला या उपक्रमाची दि. 1 नोव्हेंबर पासून पुन्हा सुरुवात झाली आहे.

esahas.com

नवाब मलिक यांच्या प्रतिमेला साताऱ्यात फासले काळे

सन १९९३ मध्ये मुंबई येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील शिक्षा भोगत असलेले आरोपी व अतिरेक्यांशी जाहीर संबंध असलेल्या महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील पोवई नाका येथे नवाब मलिक यांच्या प्रतिमेला काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आला.

esahas.com

कायदेशीर बांधकाम परवानगी घेताना सरकारी अनास्थेमुळे येताहेत अडचणी व समस्या

घोषित असलेल्या गावठाणांपासून या गावांच्या सन 2011 च्या लोकसंख्येनुसार बिनशेती व बांधकाम परवानगी देण्याचे धोरण सुरू झाले. त्यापूर्वी कोणत्याही गावच्या महसुली हद्दीत कोठेही बिनशेती परवानगी दिली जात असे. या धोरणामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावच्या गावठाणाची अधिकृतता असणे अत्यंत आवश्यक व महत्वाचे झाले.

esahas.com

राष्ट्रवादी सहकार पॅनेलच्या ११ जागा बिनविरोध

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलने 21 पैकी 11 जागा बिनविरोध जिंकून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. सहा सोसायटी मतदारसंघांसह एकूण 10 जागांसाठी वीस उमेदवार रिंगणात असून त्यासाठी राजकीय रणनीती गतिमान होणार आहे. मात्र भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी निवडणुकीतून आपले अर्ज माघारी घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.