maharashtra

कराडात एसटी कर्मचार्‍यांनी मुंडन करून नोंदवला निषेध

राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी : मागणी मान्य होईपर्यंत माघार न घेण्याची भूमिका

In Karad, ST workers shaved their heads and protested
कराड बस स्थानकासमोर कर्मचार्‍यांनी मुंडन करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. तसेच ढफ, टाळ, मृदूंगाच्या वाद्यात कर्मचाऱ्यांनी गोंधळही घातला. त्याचबरोबर संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणाऱ्या महामंडळाच्या अधिकार्यांसह सरकारचाही घोषणाबाजी करून निषेध नोंदवला.

कराड : कराड बस स्थानकासमोर कर्मचार्‍यांनी मुंडन करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. तसेच ढफ, टाळ, मृदूंगाच्या वाद्यात कर्मचाऱ्यांनी गोंधळही घातला. त्याचबरोबर संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणाऱ्या महामंडळाच्या अधिकार्यांसह सरकारचाही घोषणाबाजी करून निषेध नोंदवला.
राज्यभर सुरू असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही आंदोलन मागे घेतले नसल्याने हे आंदोलन चिघळल्याचे चित्र दिसून येत आहे. महामंडळ व सरकारने संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु केली आहे. तसेच तरीही जे कर्मचारी संपातून माघार घेणार नाहीत. त्यांना कायमस्वरूपी कामावरून काढून टाकण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे संपकरी कर्मचारी आणखी आक्रमक झाले असून त्यांनी जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे.
कराड बस स्थानकाबाहेर सुरु असलेल्या आंदोलनाला विविध स्तरातून वाढता पाठींबा मिळत आहे. गुरुवारी शहरातील काही तृतीयपंथींयांनीही आंदोलनात सहभागी होत पाठींबा दिला. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपला पांठिबा देत आंदोलनात सहभागी होत घोषणाबाजी करण्यात आली. त्याचबरोबर शुक्रवारी 12 रोजी विविध संघटनांच्या सहभागाने एसटी कर्मचारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देणार असल्याची माहितीही कर्मचाऱ्यांनी दिली.
दरम्यान, एसटी संपाचा नोकरदार, महाविद्यालयीन विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, रुग्णांना मोठा फटका बसत असून खाजगी वाहतूकदारांकडूनही त्यांची पिळवणूक केली जात आहे. त्यामुळे एसटी सेवा सुरळीत करण्यासाठी सरकारने लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणीही प्रवाशांकडून होत आहे.