maharashtra

वडोली-निळेश्वरमध्ये चोरट्यांकडून सुमारे दोन लाखाचे दागिने लंपास

दोन घरात चोरी : ग्रामस्थांचा पाठलाग, अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार

In Vadoli-Nileshwar, around two lakh jewelery lamps were stolen by thieves
वडोली-निळेश्वर ता. कराड येथे चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचे दागिने लंपास केले. मंगळवारी ९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना  घडली. दरम्यान, ग्रामस्थांना चोरट्यांची चाहूल लागताच त्यांनी चोरट्यांचा पाठलागही केला. परंतु,  अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. यामध्ये प्रितमकुमार शामराव पवार यांच्या घरातून  २ लाख २०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे

कराड : वडोली-निळेश्वर ता. कराड येथे चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचे दागिने लंपास केले. मंगळवारी ९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना  घडली. दरम्यान, ग्रामस्थांना चोरट्यांची चाहूल लागताच त्यांनी चोरट्यांचा पाठलागही केला. परंतु,  अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. यामध्ये प्रितमकुमार शामराव पवार यांच्या घरातून  २ लाख २०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. तसेच शशिकांत मोहनराव डुबल यांच्याही घरातील ऐवज छोट्यांनी लंपास केला आहे.
याप्रकरणी प्रितमकुमार पवार यांच्या फिर्यादीनुसार कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वडोली-निळेश्वर येथे रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास जेवण केल्यानंतर प्रितमकुमार व त्याची आई उज्वला घरातील हॉलमध्ये झोपले होते. मध्यरात्री बेडरुममधून आवाज येत असल्यामुळे आई उज्वला यांनी प्रितमकुमार याला उठवले. त्याने लाईट लावली असता तीन चोरटे पळून जाताना त्याला दिसले. त्यांनतर प्रितमकुमार याने आरडाओरडा केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ त्यांच्या घराकडे धाव घेतली. तसेच त्यांनीही चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन  चोरटे पसार झाले.
दरम्यान, प्रितमकुमार पवार यांच्या घरानजीक राहणाऱ्या शशिकांत मोहनराव डुबल यांच्याही घरात चोरट्यांनी प्रवेश केला. तसेच त्यांच्याही घरातील ऐवज लंपास केला आहे. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.