maharashtra

जुगार अड्ड्यावर छापा; फलटण येथे बारा जणांवर गुन्हा


Raids on gambling dens; Crime against twelve persons at Phaltan
तालुक्यातील खटकेवस्ती गावच्या हद्दीत वड्याचा माळ या शिवारात ऊसाच्या शेताजवळ आंब्याच्या झाडाखाली चालणार्‍या जुगार अड्ड्यावर मंगळवारी पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांनी मोबाईल व जुगाराचे साहित्य असा 77 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 12 जुगार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फलटण : तालुक्यातील खटकेवस्ती गावच्या हद्दीत वड्याचा माळ या शिवारात ऊसाच्या शेताजवळ आंब्याच्या झाडाखाली चालणार्‍या जुगार अड्ड्यावर मंगळवारी पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांनी मोबाईल व जुगाराचे साहित्य असा 77 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 12 जुगार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी 9/11/2021रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास खटकेवस्ती गावच्या हद्दीत वड्याचा माळ या शिवारात गणेश नारायण खटके यांच्या उसाच्या शेताजवळ आंब्याच्या झाडाखाली पाया शंकर निंबाळकर (रा. डोरलेवाडी तालुका बारामती) महादेव रामभाऊ खटके (रा. खटके वस्ती तालुका फलटण), गणेश नारायण खटके (रा. खटकेवस्ती तालुका फलटण), नितीन बापूराव कदम (रा. गवळीनगर तालुका फलटण), अशोक वामन घाडगे (रा. घाडगेमळा तालुका फलटण), सुनील खटके, अमोशा वाघमोडे, अजित मिंड, रामभाऊ वाघमोडे, गोरख पवार, लखन शेख, अजित गावडे हे तीन पाणी पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असताना मिळून आले तसेच घटनास्थळी 77 हजार 280 रुपयाचा किमतीचा जुगाराचे साहित्य त्यामध्ये रोख रक्कम मोबाईल, टेबल, खुर्च्या, पत्त्याची पाने असे साहित्य मिळून आल्याने यातील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील आरोपी यांच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.