maharashtra

भांडणे सोडविण्यासाठी आलेल्याच्या डोक्यात फरशी घालून खुनाचा प्रयत्न


Attempted murder by laying carpet on the head of the person who came to settle the dispute
हॉटेल चालकाशी हुज्जत घालत असताना त्यामध्ये पडलेल्या ग्राहकावर दोघांनी फरशी डोक्यात घालून खुनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : हॉटेल चालकाशी हुज्जत घालत असताना त्यामध्ये पडलेल्या ग्राहकावर दोघांनी फरशी डोक्यात घालून खुनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे.
पंकज जाधव, रवी जाधव (दोघे रा.कोडोली) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमित सतीश भोसले (वय 28, रा. एमआयडीसी, कोडोली) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 6 रोजी रात्री वाजता कोडोली येथील हॉटेल तनिष्क समोर घडली आहे. तक्रारदार अमित भोसले हे जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी संशयित दोघे हॉटेल मालक मोहन जाधव यांच्यासोबत वाद घालत होते. यावेळी तक्रारदार यांनी मोहन दादा काय झाले आहे का?’ असे विचारल्यानंतर संशयित चिडले व त्यांनी तक्रारदार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच एका संशयिताने पडलेली फरशी उचलून तक्रारदार यांच्या डोक्यात मारली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. जखमीवर उपचार सुरु असून पोलिस ठाण्यात हाफ मर्डरसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.