Satara

esahas.com

निवडणुका असलेल्या क्षेत्रात तीन दिवस मद्य विक्री बंद

निवडणूक कालावधीत अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.  दि. 20 डिसेंबर  मतदानाच्या अगोदरचा दिवस व 21 डिसेंबर मतदानाच्या दिवशी अबकारी अनुज्ञप्ती असलेल्या संपूर्ण ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्र दि. 22 डिसेंबर मतमोजणीच्या दिवशी सायं. 5 वा. पर्यंत संपूर्ण ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात या कालावधीत मद्य विक्री पूर्णपणे बंद ठेवावयाची आहे.

esahas.com

'मी नागरिक' फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद : दिलीप पाटील

‘मी नागरिक’ फाऊंडेशन, कराडने आपल्या कार्यातून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे काम खरोखरच कौतुकास्पद असून त्यांनी यापुढेही यशस्वी घोडदौड सुरू ठेवावी, असे प्रतिपादन दिलीप पाटील यांनी केले.

esahas.com

अखेर सभापतींनी केली उंब्रज आरोग्य प्राथमिक केंद्रातील कर्मचाऱ्यांची कान उघडणी

उंब्रज, ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना सिरीज विकत आणण्यासाठी भाग पाडल्याने संतापाची लाट निर्माण झाली. तसेच डाटा आँपरेटर लस टोचत असल्याने घटनास्थळी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी प्रसिद्धी माध्यमातून आवाज उठवला गेल्यानंतर जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. काल सायंकाळीच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वच आरोग्य केंद्राना याबाबत दक्षता घेण्याचे आदेश काढले.

esahas.com

धोकादायक पध्दतीने ऊस वाहतूक

सातारा-लातूर महामार्ग असल्याने या मार्गावर अगोदरच मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. त्यात ऊस गळीत हंगाम सुरू झाल्या पासून या मार्गावर ही ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. सकाळ व सायंकाळी या रस्त्याने सर्व शासकीय, खासगी व बँक आदी कार्यालयाचे अधिकारी वर्ग, शिक्षक व विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॅालीत क्षमतेपेक्षा किती तरी पटीने जास्त ऊस भरलेला असतो.

esahas.com

WhatsApp मध्ये मोठा बदल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, WhatsApp ने या फीचरवर काम सुरू केले आहे. हे फीचर आणण्यामागचा उद्देश युजर्सच्या गोपनीयतेचे रक्षण करणे हा आहे. फीचर अंतर्गत, इतर कोणीतरी चॅटचा स्क्रीनशॉट घेताच. WhatsApp ही माहिती लगेचच पहिल्या यूजरला नोटिफिकेशनच्या स्वरूपात देईल.

esahas.com

Apple: जबरदस्त! भन्नाट फीचर्ससह येणार iPhone 14, मिळणार आतापर्यंतचे सर्वोत्तम डिझाइन आणि कॅमेरा

• लवकरच लाँच होणार iPhone 14. • iPhone 14 सीरिजच्या स्पेसिफिकेसन्सचा खुलासा. • फोनमध्ये मिळेल पंच-होल डिस्प्ले आणि दमदार कॅमेरा.

esahas.com

चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणी कराड नगर अभियंता व उपअभियंता यांना तात्काळ निलंबित करा !

चिमुकल्याचा मृत्यू प्रकरणी नगर अभियंता व उप अभियंता यांना तातडीने निलंबित करा व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ येथे प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे  मानव कल्याणकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष मा. सलीम पटेल व राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष मा. इम्रान मुल्ला यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. 

esahas.com

वाहतुकीसंबंधी आकारण्यात येणार्‍या दंडामध्ये झाली दुप्पटीहून अधिक वाढ

महाराष्ट्र राज्य गृहविभागाने वाहतुकीसंबंधी आकारण्यात येणार्‍या दंडामध्ये वाढ केली असून सर्वच दंडाची रक्कम दुप्पटीहून अधिक करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातही हा नियम लागू झाला असून शहरवासीयांनी वाहतुकीबाबत नियमांचे पालन करुन सहकार्य करावे. अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सपोनि विठ्ठल शेलार यांनी दिला आहे.

esahas.com

दुचाकीची चोरी

सातारा येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या कनिष्क हॉल ते सिम्बॉयसिस हॉस्पिटल या मार्गावर डाव्या बाजूला असणाऱ्या उद्यानाच्या गेटच्या समोर लावलेली पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेली आहे.

esahas.com

उसने पैसे दिले नाहीत म्हणून मजूरास मारहाण

उसने पैसे दिले नाहीत म्हणून मजूराला मारहाण करणाऱ्या प्रतापसिंहनगरातील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यशवंत ओव्हाळ असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. सातारा शहरातील विसावा नाका परिसरात असणाऱ्या सातारा हॉस्पिटलच्या चौकात रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.